हल्ली investment frauds खूप वाढले आहेत. आपली अशी फसवणूक टाळण्यासाठी काही गोष्टी कायम लक्षात ठेवा.
1. घाई हे फसवणुकीचे सगळ्यात मोठे लक्षण.
“शेवटची संधी”, “ऑफर फक्त आज”, “तात्काळ निर्णय घ्या” अश्या मेसेजेस चा उद्देश असतो कि आपल्याला विचार करायला वेळ मिळू नये. खऱ्या गुंतवणुकी मध्ये आपल्याला माहिती वाचायला, प्रश्न विचारायला आणि निर्णय घ्यायला पुरेसा वेळ दिला जातो.
2. अनोळखी मेसेजेस म्हणजे धोक्याची घंटा
WhatsApp किंवा Telegram वर कोणी अनोळखी माणूस investment tips देत असेल, तर विचार करा कि, जर एखाद्याकडे खरोखर श्रीमंत होण्याची ‘सिक्रेट’ युक्ती असेल, तर तो ती तुम्हाला का सांगेल? तो स्वतःच श्रीमंत झाला नसता का? आणि श्रीमंत झाल्यावर त्याला YouTube वर advertise करायची गरज पडली असती का?
3. पैसे कोणाला देताय ते बघा
जर कोणी तुम्हाला त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करायला सांगत असेल, तर तिथेच थांबा. अधिकृत कंपन्यांची स्वतःची कॉर्पोरेट खाती असतात. दुसरी गोष्ट म्हणजे कागदपत्रं! प्रत्येक खऱ्या गुंतवणुकी चे ‘SEBI’ ने approve केलेले offer documents असतात. जर कागदपत्रं द्यायला कोणी टाळाटाळ करत असेल, तर तो मोठा धोका आहे.
4. नफा किती मिळेल याच्या Realistic अपेक्षा ठेवा
बँक FD मध्ये ६-७% व्याज मिळतं. शेअर मार्केटमध्ये long term मध्ये ११-१३% पर्यंत फायदा होऊ शकतो. पण जर कोणी यापेक्षा खूप जास्त Guaranteed Return देत असेल, तर सावधान.
विचार करा, बँका ११-12% दराने कर्ज द्यायला तयार असताना, का कोणी तुमच्या कडून 15% व्याजाने पैसे घेईल? कारण त्यांना बँका कर्ज देत नाहीत! ज्यांना बँका कर्ज द्यायला घाबरतात, त्यांना आपण आपले पैसे देणे कितपत सुरक्षित आहे?
शेवटी एकच लक्षात ठेवा, गुंतवणुकीत थोडे चढ-उतार तर येणारच, पण आपले पैसे पूर्णपणे बुडणार नाहीत याची काळजी घेणं महत्त्वाचं!


Leave a comment